आओ मिलकर अलख जगाए शत प्रतिशत मतदान कराए,मनियार बिरादरीचा अभिनव संकल्प.!!!
जळगांव प्रतिनिधी :-
भारताची लोकशाही व संविधाना च्या रक्षणासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन १००% मतदान करूया अशा आशयाचा संकल्प जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीच्या माध्यमातून शुक्रवार नमाज पठणानंतर एकत्रितरित्या करण्यात आला.
जुमा की नमाज व अक्षय तृतीया हे दोन्ही धार्मिक कार्यक्रमाचे ठिकाण रथ चौक व दोघी धार्मिक स्थळाच्या मध्ये तरुण उभे राहून जाणारे येणारे लोकांना शंभर टक्के मतदान करण्याचे तोंडी व बॅनर द्वारे आवाहन करीत असतानाचे दुर्मिळ योग आज जुळून आले.
त्यावेळी उपस्थित मतदारांनी प्रतिज्ञा केली की आम्ही निश्चितच आमच्या परिवार व मित्र परिवार सह या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊ अशा आशयाची प्रतिज्ञा घेतली.
बीरादरीचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी मतदानाचे महत्त्व विशद करताना प्रतिज्ञा का आवश्यक आहे ते पण सांगितले असता स्वस्फुर्तीने उपस्थित जमावाने प्रतिज्ञा करू मतदान करण्याचे अभिवचन दिले.
यावेळी हिंदीमध्ये मतदारांना आवाहन करण्यासाठी विविध घोषणा फ्लेक्स वर लिहून त्या दर्शवण्यात आल्या होत्या.
0 टिप्पण्या