बांबरुड प्र. ब. येथील माजी सैनिक प्रविण राजपुत महाराष्टृ रत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!

 बांबरुड प्र. ब. येथील माजी सैनिक प्रविण राजपुत महाराष्टृ रत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!


भडगाव प्रतिनिधी :— 

राजपूत समाजातील चार कतृत्वान व्यक्तींना महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आले. विविध क्षेत्रात त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २४ रोजी महीला बहुउद्देशीय संस्था भुसावळ यांनी आयोजीत केला होता. महाराष्ट्र रक्षक सेनाचे अध्यक्ष व माजी सैनिक प्रविण राजपुत यांना अनुश्री महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व सविधान दिनानिमित्त २०२५ चा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रविण राजपूत यांनीआर्मी मध्ये १८ वर्षे देश सेवा केली आहे. त्याच सोबत समाज कार्य देखील चालु ठेवले आहे. हा पुरस्कार त्यांना महीला संस्थेच्या अध्यक्ष जयश्री इंगळे , राष्ट्रीय करणी सेनेचे अध्यक्ष दामोदर राजपुत,

नोबेल इंग्लिश स्कूल च्या संस्थापक अध्यक्ष डाॅ.अर्चना सुर्यवंशी व स्वामी समर्थ स्कुल च्या संस्थापक वर्षाताई व भुसावळ नगर अध्यक्षा गायत्री ताई भंगाळे या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

राष्ट्रीय करणी सेनेचे प्रदेश सचिव 

कॅप्टन राजेंद्र सिंह राजपूत यांना अरबी महीला संस्था यांच्या वतीने मिर्झा गालिब या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच करणी सेनेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षा सारीकाताई राजपूत यांना नारी शक्ती ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच करणी सेनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रथमेश सुर्यवंशी यांना पण महाराष्ट्र रत्न ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सन्मान मिळाल्यानंतर मित्र मंडळी व नातेवाईक व समाजाकडून शुभेच्छांचा त्यांच्या वर वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या