"बहार "पत्नीच्या आठवणीत मुंबईच्या शफी शेख ने ५६ पसमांदा मुलीचे विवाह लावून त्यांचे आयुष्यात "बहार" निर्माण केली.
आपली अर्धांगिनी बहार यजदानी यांचे ८ वर्षांपूर्वी अचानक मृत्यू झाल्याने तिच्या आठवणीत समाजातील गरीब मुलींचे मागील सात वर्षांपासून आपल्या स्वखर्चाने आतापावेतो ५६ लग्न लावून त्यांना आवश्यक ते संसार उपयोगी वस्तू सह पाहुण्यांना जेवण देऊन बिदाई करून आपल्या पत्नीच्या नावाला अनुसरून त्या ५६ मुलींच्या जीवनात बहार आणणारे मुंबई येथील मोहम्मद शफी शेख बाबू व त्यांचे परिवार यांनी समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे ही बाब समाजाच्या प्रत्येक घटकाने नोंद करावी असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केले आहे.
अडावद येथे ११ मे रोजी ११ सामूहिक विवाह चे आयोजन मदरसा काफियातुल उलूम या ठिकाणी करण्यात आले होते त्यावेळी शेख हे बोलत होते.
यावेळी अडावद येथील प्रमुख सईद खान,हाजी कबिरोद्दीन, हाजी जहिरोद्दिन, शब्बीर सर , फारूक पटेल सर, हाजी रज्जाक,शकील मेंबर,नासीर सर,मौलाना खिलाफत अली तसेच जळगावचे कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, कादरिया फाऊंडेशनचे अध्यक्ष फारुक कादरी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक चे अध्यक्ष मजहर पठाण, पाचोरा काँग्रेसचे प्रमुख इरफान शेख,उभाठा शिवसेनेच्या श्रीमती गायत्री सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोहम्मद शफी यांचे आजोळ हे अडावद गाव असल्याने ते या ठिकाणी हे कार्य करीत असल्याने गावकऱ्या मार्फत त्यांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला.
0 टिप्पण्या