कोळगाव–सावदा परिसरात अवैध गोण खनिज वाहतूक सर्रास भरधाव ट्रॅक्टरमुळे नागरिकांना त्रास; तातडीच्या कारवाईची मागणी.!!!

 कोळगाव–सावदा परिसरात अवैध गोण खनिज वाहतूक सर्रास
भरधाव ट्रॅक्टरमुळे नागरिकांना त्रास; तातडीच्या कारवाईची मागणी.!!!

भडगाव ता. प्रतिनिधी :-अमीन पिंजारी

भडगाव तालुक्यातील कोळगाव–सावदा परिसरात कोणताही वैध परवाना नसताना गोण खनिजाची अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. गोण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर कोळगाव–सावदा रस्त्यावरून भरधाव वेगाने धावत असल्याने रस्त्यावरील वाहनधारक व पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे ही वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर असतानाही संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. भरधाव वेगामुळे अपघाताची शक्यता वाढली असून, लहान मुले, वृद्ध नागरिक व दुचाकीस्वार यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

दररोज मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरद्वारे गोण खनिजाची वाहतूक होत असून रस्त्यांची दुरवस्था देखील वाढत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अवैध गोण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर त्वरित कारवाई करून दोषींवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अवैध खनिज वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी परिसरातून जोरदार होत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या