उसनवारीचे पैसे मागीतल्यावरुन भडगाव येथील एकाचा खुन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
उसनवारी दिलेले पैसे परत मागणीच्या कारणावरून व काहीतरी जादूटोणा केल्याच्या संशयावरून भडगाव पेठ येथील ७८ वर्षीय वृद्धांचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे घटना घडली आहे . या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला मयत वृद्धाच्या मुलाने एका २४ वर्षीय आरोपी विरूद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हि घटना वरखेड ता.भडगाव येथील खदानी जवळ दि.८ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने भडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या बाबत अधिक महिती अशी की , फिर्यादी - ज्ञानेश्र्वर सुपडू पाटिल रा. वरची पेठ भडगाव यांचे वडील सूपडू नाना पाटील वय ७८ वर्ष हे भगत असल्याने त्यांच्याकडे नेहमी लोकांचे येणे जाणे होते. त्यामूळे त्यांच्याकडे पेठ भागातील हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे वय २४ वर्ष हा सुध्दा नेहमी येतं असल्याने त्याच्या सोबत सर्वांची ओळख होती. त्यास माझे वडील सुपडू नाना पाटील वय ७८ वर्ष यांनी मार्च महिन्या मध्ये उसनवारीने एक महिन्याच्या बोलीवर एक लाख रू दिलेले होते.परंतु ते त्याने परत केलेले नाहीत. म्हणुन दि. ७ रोजी दुपारी माझे वडीलांनी माझ्यासमोर हितेश उर्फ कुणाल मराठे यास फोन लावुन पैशांची मागणी केली असता त्याने पैसे परत देण्याच्या कारणावरुन माझे वडीलांशी अरेरावी केली होती असे सांगीतले. तसेच दि. ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजेनंतर नेहमीप्रमाणे जेवण करुन पेठ चौफुलीवर फिरण्यासाठी गेले होते. माञ वडील राञभर घरीच आले नाहीत. दि. ८ रोजी सकाळीही वडील दिसले नाहीत. त्यानंतर वार्ता कळाली की माझे वडील सुपडु नाना पाटील हे मयत स्थितीत वरखेड गावाजवळ असलेल्या खदानीत पडलेले असुन त्यांचे डोक्यातुन रक्त आलेले आहे. घटनास्थळी खदानीजवळ पोहोचलो असता माझे वडील मयत स्थितीत पडलेले दिसुन आले. त्यांचे डोक्यावर , कपाळावर , चेहर्यावर पुर्ण रक्त लागुन शर्ट रक्ताने भरलेला होता. जमिनीवरही रक्ताचे थारोळे जमा झालेले होते. तसेच गालावर, कानाजवळ व उजव्या हाताच्या पंजावर धारधार शस्ञाने वार केलेला दिसत होता. तेव्हा पोलीसांनी लागलीच हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे वय २४ वर्ष यास बोलावुन विचारपुस केली असता त्यानेच ऊसनवारीने दिलेले पैसे परत देण्याच्या कारणावरुन व वडीलांनी काहीतरी जादुटोणा केल्याच्या संशयावरुन धारधार शस्ञाने खुन केल्याची कबुली दिली. त्यामुळे माझी खाञी झाली की, माझे मयत वडील सुपडु नाना पाटील वय ७८ वर्ष रा. पेठ वरची भडगाव यांचा खुन धारधार शस्ञाने वार करुन हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे वय २४ वर्ष. रा. वरची
पेठ भडगाव यानेच केला आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वर सुपडु पाटील मयताचा मुलगा यांच्या फिर्यादीवरुन संशयीत आरोपी हितेश उर्फ कुणाल चुडामण मराठे वय २४ वर्ष. रा. वरची पेठ भडगाव याच्या विरुद्ध भादवि कलम ३०२ , २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहेत.
याबाबत जळगाव गुन्हे शाखा पथकाने खुनाच्या गुन्हयातील आरोपीला अवघ्या ५ तासात गुन्हा निष्पन्न करुन ताब्यात घेतले आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कार्यवाही केली. गुप्त माहितीनुसार मयत सुपडु पाटील हा हितेश उर्फ कुणाल मराठे याच्या सोबत होता. त्यावरुन पथकाने हितेश उर्फ कुणाल मराठे याचा शोध घेउन ताब्यात घेतले. विचारपुस केली असता पैशांची मागणी करीत वारंवार तगादा लावत होता. म्हणुन हितेश उर्फ कुणाल मराठे याने खुन केल्याची कबुली दिली. कि सुपडु पाटील यांना मला तुमचे पैसे दयायचे आहेत. असे सांगुन वरखेडला एकजण पैसे देणार आहे. असे सांगुन कुणाल मराठे हा सुपडु पाटील यांना वरखेड गावाच्या दिशेने घेउन गेला. व त्याठिकाणी असलेल्या उजव्या बाजुच्या खदाणीत त्याला घेउन जाऊन मोटारसायकलीवरुन खाली उतरवुन कुणालजवळ असलेल्या चाॅपरने वार करीत सुपडु पाटील यांचा खुन केला. अशी कबुली आरोपी कुणाल मराठे याने पोलीसांना दिली. त्यावरुन कुणाल मराठे याला ताब्यात घेउन भडगाव पोलीस स्टेशनला आणले होते. असे प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोटमध्येही जळगाव गुन्हे शाखा पथकाने नमुद केलेले आहे.
0 टिप्पण्या