तब्बल २५ वर्षांनी पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा.वाडे येथील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा स्नेहमेळावा.
आठवणींना मिळाला दुजोरा.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील
वाडे येथील माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या १९९९ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. ७ रोजी सकाळी १२ वाजता आयोजीत करण्यात आला होता. हा कार्यक्रम वाडे येथुन जवळच असलेल्या श्रीक्षेञ ऋषीपांथा या देवस्थानावर गिरणा काठी निसर्गरम्य हिरवळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला. गेल्या २५ वर्षांनंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी भूतकाळातील आठवणीत रमुन गेलेले होते. विदयार्थ्यांच्या बालपणीच्या व शालेय जिवनातील सार्या आठवणींना जणु उजाळाच मिळाला.
या स्नेहमेळाव्याला गुरुजनांची उपस्थिती व २५ वर्षानंतर आपल्या विद्यार्थ्यांना एकत्रित भेटण्याचा योग आल्याचे समाधान त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन आपल्या शालेय जीवनातल्या आठवणींना उजाळा दिला जणू काही त्यांच्या त्या वेळेचा वर्गच आज अवतरला होता. तब्बल २५ वर्षानंतर शालेय जिवनानंतर या माजी विदयार्थ्यांची शाळा गुरुजनांच्या उपस्थितीत भरली होती असे अनोखे चिञ दिसुन आले. त्याचप्रमाणे आपल्या जीवन कार्याचा परिचय माजी विदयार्थी व विदयार्थीनींनी या कार्यक्रमात करून दिला. शिक्षक व विदयार्थ्यांच्या जुन्या आठवणी रंगल्याने वेळोवेळी हास्याचे फवारे उडाल्याचे दिसुन आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाडे माध्यमिक विदयालयाचे जेष्ठ व सेवानिवृत्त शिक्षक पी. आर. माळी हे होते.
कार्यक्रमासाठी वाडे माध्यमिक विदयालयाचे सेवानिवृत्त शिक्षक पी.आर.माळी , युवराज भोसले , एन.सी.माळी , एस.बी.मोरे ,अशोक परदेशी ,नितीन पाटील, वाडे प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक गोविंद परदेशी आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीस प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत सर्व शिक्षक, गुरुजनांचे विठ्ठल रुख्माई यांची मुर्ती भेट देउन रुमाल, टोपी, गुलाबपुष्प देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी प्रतीक्षा पाटील,उदलसिंग परदेशी,नामदेव पाटील,चंद्रशेखर पाटील व संदीप राजपूत, ज्ञानेश्वर परदेशी, धर्मराज पाटील यांनी मनोगतात शाळेच्या बालपणातील आठवणी सांगितल्या. सर्व विदयार्थी व विदयार्थीनींनी आपला परीचय देउन गंमतीशीर आठवणी समोर मांडल्या. या कार्यक्रमात हास्याचे मोठे फवारे उडाल्याचे दिसुन आले. स्नेहमेळाव्याला ४५ विद्यार्थी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर परदेशी म्हणाले कि, नंतर विखुरलेल्या मित्र मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी स्नेहमेळावा आयोजित केला होता.धर्मराज पाटील म्हणाले २५ वर्षानंतर जुने मित्र मैत्रिणी एकत्र आणू शकलो. याचे समाधान आम्हाला लाभले. प्रतीक्षा पाटील म्हणाल्या या स्नेहमेळाव्यामुळे आम्हाला २५ वर्षांनंतर आमचे वर्गबंधू - वर्गभगिनी भेटल्या असे म्हणाल्या. अशोक परदेशी यांनीही मनोगतातुन विदयार्थ्यांच्या आयोजीत कार्यक्रमाचे कौतुक करुन भावीआयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त शिक्षक पी.आर. माळी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले, की माजी विद्यार्थी हे शाळेच्या प्रगतीचे आधारस्तंभ आहेत.त्यांच्या यशामुळे प्रशाळेचे नाव उज्वल होते. काही वर्गातील आठवणी व गंमतीदार किस्से, शिस्तीचे धडे कसे दिले हे दिलखुलास विनोदातुन मांडले . यावेळी उपस्थित विदयार्थ्यांमध्ये पुन्हा हास्याचे फवारे उडाल्याचे दिसुन आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विदयार्थी ज्ञानेश्र्वर परदेशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व आभार धर्मराज पाटील यांनी मानले. त्यानंतर निसर्गाच्या सानीध्यात सर्व विदयार्थी, विदयार्थीनी यांनी गुरुजनांसोबत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
0 टिप्पण्या