तांदुळवाडी सरपंच पदि वत्सलाबाई पाटील यांची निवड बिनविरोध. पञकार अशोक परदेशी यांनीही केला सत्कार.


भडगाव प्रतिनिधी :—

 तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सरपंच पदि वत्सलाबाई दादा पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणुन गोंडगाव मंडळ अधिकारी राजश्री जानराव हया होत्या. त्यांना ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले. ही निवडीची विशेष सभा दि. १४ रोजी दुपारी २ वाजता पार पडली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच वत्सलाबाई पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे नकुल सैंदाणे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी ही निवड घेण्यात आली. यावेळी मावळते सरपंच नकुल सैंदाणे, उपसरपंच वंदनाबाई पाटील, सदस्या मनिषा पाटील, सिताराम पवार, अनिता मांग, शिवाजी भिल्ल आदि सदस्य हजर होते. यावेळी छोटेखानी सत्कारा व वृक्ष लागवडीचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे सुञसंचलन शरद पाटील यांनी केले. याप्रसंगी मळगाव तांदुळवाडी विकासोचे चेअरमन


जयवंतराव पाटील, दादा पाटील, अर्जुन पाटील, भाऊसाहेब पाटील, बाबुराव पवार, नागो पवार, विजय पाटील , भडगाव पञकार अशोक परदेशी यांचेसह ग्रामस्थ तसेच तलाठी करण कुलकर्णी, पो. काॅ. नरेंद्र विसपुते, पो. काॅ. दिलीप पाटील, पोलीस पाटील किरण बागुल, कोतवाल कविता सोनवणे, शितल राजपुत, राजेंद्र महाजन आदि उपस्थित होते. सेवक अशोक पाटील, सफाई कर्मचारी रविंद्र खैरनार, पाणी पुरवठा कर्मचारी राजेंद्र महाजन आदि ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांनी परीश्रम घेतले. या निवडीनंतर ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली व सरपंच निवडीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी पञकार अशोकबापु परदेशी यांनीही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देउन नवनिर्वाचित सरपंच वत्सलाबाई पाटील, दादाभाऊ पाटील यांचा सत्कार केला.