शिवसेना (उद्धव ठाकरे)शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन



आमदारांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगावला दुष्काळ जाहीर झाला नाही -वैशाली ताई सूर्यवंशी-


पाचोरा प्रतिनिधी :-

दिनांक २१रोजी पाचोरा तहसीलकार्यालय समोर शेतकर्‍यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी दिनांक २१रोजी महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. 

याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निष्क्रीयतेमुळे पाचोरा-भडगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नसल्याचे टिकास्त्र सोडले.


शेतकर्‍यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध घोषणांनी परिसर दणाणून निघाला. यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष या घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झालेत. 


याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी म्हणाल्या की, जगाचा पोशींदा असणारा बळीराजा सध्या खूप अडचणीत आहे. त्याच्या पिकाला भाव मिळत नाही. यातच, केंद्र व राज्य सरकारची धोरणे हे शेतकरी विरोधात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी हमी भाव देणार असल्याचे जाहीर करून देखील आतापर्यंत यावर निर्णय झाला नसल्याचे सांगत जोरदार टिकास्त्र सोडले.


याप्रसंगी वैशालीताई सुर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील हे निष्क्रीय असल्याने मतदारसंघात दुष्काळ जाहीर झाला नसून शेतकर्‍यांची यामुळे हानी झाल्याची टिका केली. आमदार सत्तेत असून देखील शेतकर्‍यांना दिलासा देऊ शकले नसल्याचा टोला त्यांनी मारला. 


दरम्यान, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अरूण पाटील यांनी पीक विम्यावरून जोरदार टिकास्त्र सोडले. पीक विम्यात जिल्ह्यामध्ये दीडशे कोटींचा गैरव्यवहार झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजहर खान यांनी शेतीमालास योग्य भाव मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कॉंग्रेसचे नेते विठ्ठलराव गुंजाळ यांनी देखील सरकारवर टिकास्त्र सोडले. 


धरणे आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकार्‍यांना सुपुर्द करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंह सुर्यवंशी,  उध्दव मराठे, रमेश बाफना, अरूण पाटील, रतन परदेशी, राहूल पाटील, शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अजहर खान, तिलोत्तमा मौर्य, पुष्पा बळीराम परदेशी, अरूण रूपचंद पाटील, हरीभाऊ तुकाराम पाटील, 


नंदकुमार श्रीधर सोनार, कॉंग्रेसचे अविनाश भालेराव, दीपक पाटील, बंडू मोरे, मनोहर चौधरी, संदीप जैन, हरीश देवरे, भूपेश सोमवंशी, निखील पाटील, प्रशांत पाटील, योगेश कासार, जितेंद्र बोरसे, भरत पाटील, शेख शकील शेख वासू, पुंडलीक पाटील, तुकाराम धनगर, नामदेव धनगर, अमोल गायकवाड, ऍड. प्रशांत पाटील, विनोद बाविस्कर, चेतन पाटील, पुनमचंद परदेशी, ऍड. अमजद पठाण, हरीशभाऊ पाटील, प्रेमराज पाटील, पंकज पाटील, कैलास आप्पा क्षीरसागर, अजयदादा तेली, प्रितेश जैन, भगवान पाटील, गुलाब पाटील,  अमजद पठाण, ईस्माइल तांबोळी, भरत खंडेलवाल, संदीप प्रवीण ठाकरे, जे. के. पाटील, शशिकांत पाटील, संतोष पाटील, समाधान विश्‍वास पाटील, भारत शंकर पाटील, भाईदास माधवराव धुमाळ, शेख शकील शेख बाबू, पुंडलीक पांडुरंग पाटील, तुकाराम धर्मा धनगर, वसंत आबा बाविस्कर, धरमसिंग पाटील, गोकुळसिंग गांगुर्डे, नितेश पाटील, नवल राजपूत, पप्पू राजपूत, खंडू सोनवणे, सुभाष पुंडलीक राठोड, अनिल दगडू पाटील, नामदेव रामा धनगर, धीरज संजय ठाणगे, यश युवराज शिरसाठ, अमोल सुभाष गायकवाड आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.