पाचोरा पोलीस स्टेशनचे तीन पोलीस कर्मचा्यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला
पाचोरा, प्रतिनिधी
(अनिल आबा येवले )
पाचोरा येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी श्री राहुल बेहरे यांनी गेल्या चार ते पाच वर्षाच्या कालावधीत अनेक गुन्हेगारांना सुधरवण्यात त्यांनी सहकार्य केले. असून तसेच कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल अशा प्रमाणे गुन्हेगारांना सुधरवण्यात त्यांचा मोठा हात असून पोलीस खात्यातील ते एक देव माणूस म्हणून त्यांची ओळख आहे व्यक्ती ओळखीचा असो किंवा नसो त्यांच्याकडे समस्या घेऊन आल्यास ती सोडवण्यासाठी ते स्वतः स्वतःचा खर्च करून त्या व्यक्तीला मदत करीत असतात त्यांनी अनेक घटनांमध्ये अनेकांना सहकार्य केले आहे. मागील काळात अपंग व्यक्तींना तसेच बिल्ली धरणावर एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाचवण्यासाठी त्यांनी ताबडतोब पोहणारे व्यक्ती यांना बोलवून त्याचा जीव वाचविला होता तसेच रात्री दे रात्री कोणाचाही फोन आला की त्याची समस्या जाणून घेऊन त्याला सहकार्य करीत असतात तसेच पाचोरा शहरात एक अनोळखी बेवारस वेडसर व्यक्ती कोणालाही त्रास देणे दगड मारणे किंवा कोणाच्या अंगावर धावून झाले कोणाच्याही गाडीला आडवे येणे असे वर्तन करत होते त्या व्यक्तीचा कोणी नातेवाईक आहे का याची संपूर्ण माहिती घेतली असता त्याचा कोणीही नसल्यामुळे राहुल बेहरे यांनी आपले दोन सहकारी श नरेंद्र नरवाडे, कमलेश राजपूत यांना सोबत घेऊन त्या व्यक्तीला चोपडा येथील मानव सेवा या संस्थेत स्वतः जाऊन सोपविले त्यांच्या या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केला त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते साहेब,
अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर, डी वाय एस पी श्री धनंजय येरुळे साहेब, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अशोक पवार साहेब या सर्वांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री राहुल बेहरे, श्री नरेंद्र नरवाडे, श्री कमलेश राजपूत यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या