जिल्हा बालकल्याण विभागाचे जिल्हा समन्वयक अल्ताफ शेख यांचा सन्मान.!!!
ठाणे:
महाराष्ट्र शासनाच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेनुसार राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील कचरावेचक, भिक्षुकांसाठी आणि गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या तसेच रस्त्यावरील बालकांसाठी आरोग्य, आहार आणि शैक्षणिक सुविधा पुरवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा समन्वयक अल्ताफ हसन शेख यांना जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे द्वारे सन्मानित करण्यात आले.
जिल्हा बालकल्याण विभागाचे जिल्हा समन्वयक अल्ताफ शेख यांचा जिल्हा महिला व बालकल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे तर्फे सन्मान
महाराष्ट्र शासनाच्या सर्वागीन विकासाच्या संकल्पनेस अनुसरुन राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत ठाणे जिल्यातील कचरावेचक.
भिक्षेकरी.व गलिच्छ वस्तीमध्ये राहणाऱ्या तसेच रस्त्यावरील बालकांसाठी आरॊग्य आहार शैक्षणिक सुविधा हा उपक्रम राबविला जातो या उपक्रमात ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल एक पाऊल प्रगतीकडे हे सन्मानचिन्ह देऊन अल्ताफ हसन शेख कागदी यांना नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय ठाणा येथे 21/06/2024 रोजी सायंकाळी चार वाजता सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक जी शिनगारे जिल्हाधिकारी ठाणे .
कार्यक्रमाचे उदघाटन अनुप कुमारजी यादव सचिव महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख पाहुणे कैलासजी पगारे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे. हे होते.
राहुल जी मोरे सह आयुक्त महिला व बालविकास. महाराष्ट्र राज्य.
सुरेश टिळे उपायुक्त महिला विकास महाराष्ट्र राज्य. सुवर्ण पवार विभागीय उप. आयुक्त. महिला बालविकास कोकण विभाग. योगेश जी जवादे कार्यक्रम व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था पुणे सदरील कार्यक्रमाला इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली.
अल्ताफ शेख हे चाळीसगावचे भूमिपुत्र असून त्यांनी मुंबईसारख्या शहरात स्वतःची प्रगती साधत विविध समाजकार्य करत चाळीसगाव चे नाव रोशन केले आहे. या यशाबद्दल अल्ताफ हसन शेख यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या