भडगाव शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे डम्पर जप्त.!!!



भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव,७ जुलै २०२४ रोजी रात्री, भडगाव शहरातील पेठ भागात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक डम्पर ताब्यात घेण्यात आले आहे. 


रात्री १० वाजता, निवासी नायब तहसीलदार  सुधीर सोनवणे रावसाहेब यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही कारवाई केली. यात तलाठी टोणगाव. राहुल पवार, तलाठी भडगाव. अविनाश जंजाळे, तलाठी जारगाव. आशिष काकडे, तलाठी कोळगाव. व्ही पी शिंदे आप्पा आणि तलाठी वाक. पाशा हलकारे आप्पा.यांचा समावेश होता. 


अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डम्पर शासकीय विश्रामगृहात जमा करण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.