पत्रकारा तर्फे गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.


जामनेर प्रतिनिधी :-

 जामनेर येथील प्रामाणिक व समाजसेवी पत्रकार बांधवांनी एकत्र येत आजच्या घडीला गोविंद महाराज नगर येथील जिल्हा परिषद शाळेत गरजु आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सविस्तर व्रुत्त असे की या गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील तसेच जामनेर न. प. चे माजी उपनगराध्यक्ष महेंद बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. 



त्याप्रसंगी महेंद बाविस्कर यांनी प्रामाणिक पत्रकार हा फक्त आपल्या परीसरातील घडामोडी जगाच्या समोर मांडत नसुन तो समाज मनाचा आरसा असतो. आज जामनेर येथील पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन आदिवासी गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले हे साधे व सोपे नाही. आपली आजची येणारी पिढी हि खऱ्या अर्थाने उद्या देशाचे भविष्य आहे. 


आणी आज ग्रामीण भागात अर्थकारणाने अनेकांना आपलं शिक्षण घेता येत नसुन किंवा ते अर्धवट थांबवावे लागते. त्यातुन अनेक ठिकाणी शिकण्यासाठी योग्य साधने व साहित्य यांची पुर्तता नसते. अशाच काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून तसेच गरजु विद्यार्थ्यांना मदतीसाठी जामनेर येथील काही दानशूर व्यक्ती पुढे आल्या आणी या सर्व दानशूर व्यक्तीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपासाठी मदत मिळाली. 


निव्वळ स्वार्थीपणा अंगीकारुन न घेता पत्रकार बांधव फक्त निमित्ताचे कारण होते. पण खरे दानशूर व्यक्ती हि पडद्यामागे होती शिक्षणासारख्या पवित्र कार्यात आम्हालाही वाहुन घेण्याची संधी मिळाली या पेक्षा मोठे भाग्य काय शैक्षणिक मदत हाच खरा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अडकलेल्यांना गरजुंना मदतीचा हात देऊन त्यांचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचा आदर्श या प्रामाणिक पत्रकारांनी हाती घेतला. अंगी गुण असुन सुद्धा केवळ आर्थिक परिस्थिती अभावी विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. सुमारे १०० विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. पत्रकार बांधवांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे त्यांनी केलेल्या कार्यात दानशूर व्यक्तींनी सहकार्य केले तसेच आणखी जोमाने कार्य करीत रहावे. 


तसेच राज्य शासनाच्या वतीने " मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना" संदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यासह शहरात अनेक भागात महिलांना फॉर्म भरण्यासाठी पथक नेमण्यात आले असुन या योजनेचा लाभ प्रत्येक महिलांनी घ्यावा. असे आवाहन महेंद बाविस्कर यांनी केले. त्यावेळी पत्रकार सुनिल इंगळे, अनिल शिरसाठ, नितीन इंगळे, देविदास विसपुते, किरण चौधरी, सागर लव्हाळे, बबलु शेख, इम्रान खान, सुनिल सुरवाडे, मनोज दुबे, ईश्वर चौधरी तसेच केंद्र प्रमुख संगिता पालवे, शाळेचे मुख्याध्यापक अनंत अरतकर, खेमराज नाईक यांच्या सह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.