शेतकरी,महिला, तरुण सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण असणारे एकमेव नेतृत्व आमदार किशोर आप्पा पाटील



भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा भडगाव मतदार संघात किशोर आप्पा पाटील हे सर्वसामान्य जनतेच्या मनातील आमदार आहेत.



त्यांनी केलेली विकास कामे, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांच्या समस्यांची सोडवणूक अन् पाचोरा भडगाव तालुक्यातील तरुणांचा मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे किशोर आप्पा यांचा विजय निश्चित असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांना साथ देण्याचे आवाहन आसिम मिर्झा यांनी केले आहे.


किशोर आप्पा पाटील यांनी शेतकरी कुटुंबातील राजकारणात गरुडझेप घेतली आहे. ती केवळ सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्यामुळेच. सर्वसामान्यांच्या सुख दुखात तसेच ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, तरुण यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आल्यामुळे मतदारांनी त्यांना भरभरून असे प्रेम दिले आहे. किशोर आप्पा पाटील यांनी प्रत्येक समस्याचे निराकरण करण्याची कला, कसब आत्मसात केले असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात किशोर आप्पा यांच्याबद्दल मोठी सहानुभूती आहे. त्यांनी मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.


अखंडपणे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भरत असलेला जनता दरबार गेल्या पाच वर्ष सुरूच होता. मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, तरुणांनी हातात घेतलेली निवडणूक अन् विकासकामांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून किशोर आप्पा यांनी प्रचारात देखील आघाडी घेतली आहे. त्यांना सर्वच स्तरांमधून मिळत असलेल्या पाठींब्यामुळे विरोधकांना आपला पराभव दिसु लागला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असुन खोटेनाटे आरोप करण्यात येत आहेत. महायुती सरकारच्या काळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न होताना दिसुन येत आहे. 


  खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल, अपप्रचार, चुकीचे संदेश समाजात पसरविण्याचे काम विरोधकांकडून करण्यात येईल. परंतु कोणत्याही अमिषाला बळी अथवा अफवांवर विश्वास न ठेवता सर्वसामान्य नागरिकांच्या, गोरगरीब जनतेसाठी, महिला, तरुण यांच्या समस्यांचे निराकरण तसेच मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी किशोर आप्पा पाटील शिवाय पर्याय नाही. त्यामुळे किशोर आप्पा यांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्वांनी किशोर आप्पा यांना साथ देण्याचे आवाहन मा. संजय गांधी निराधार समिती सदस्य आसिम भाऊ मिर्झा यांनी केले आहे. 


"भडगाव येथे मुस्लिम समाजासाठी केलेले विकास कामे "-

ईद गाह.८० लक्ष रुपये ,अकसा नगर, रस्ता,कबरस्तान वॉल कंपाऊंड पंधरा लक्ष रुपये,बाडी मोहल्ला कब्रस्तान, बाराह लक्ष रुपये ,शाहिद अब्दुल हमीद चौक पाच लक्ष रुपये,अल्पंख्याक वस्ती व कब्रस्तान एक कोटी चे सोलर लाईट,यशवंत नगर भागात वीस लक्ष रुपये चे.दोन सभा गृह मंडप 


  विशेष एम एच ५४ भडगाव कराना एक नवीण ओळख दिलीआर.टी.ओ. कार्यालय,करून दाखवलं


आमदार किशोर आप्पा पाटील दहा वर्षांपासून शेतकरी, महिला, तरुण, सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवत आलेले आहेत. ग्रामीण भागातील सर्व समस्यांची किशोर आप्पा यांना जाण असल्याने मतदारांचाही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विश्वास संपादन केलेला आहे. 


केवळ निवडणुकीपुरते घराबाहेर पडणारे कोण अन् सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे कोण हे मतदारांना चांगलेच माहीत झाल्याने आमदार किशोर आप्पा पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे मत महायुतीच्या कार्यकर्त्यांमधुन व्यक्त करण्यात येत आहे.