भडगाव शेतकरी सहकारी संघात सोयाबीन खरेदी केंद्राचे उदघाटन.
भडगाव प्रतिनिधी :-
भडगांव येथे किमान आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत, संघाच्या हेड ऑफिस पाचोरा रोड भडगांव येथे दि. २८ गुरुवार रोजी खरेदी केंद्राचे उदघाटन आमदार किशोर पाटील व संघाचे प्रेसिडेंट भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांच्या हस्ते काटा पुजन करून करण्यात आले.
यावेळी प्रथम शेतकरी नाना ईश्वर पाटील यांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नवनिर्वाचीत आमदार किशोर पाटील यांचा सत्कार शेतकरी संघाचे प्रेसिडेंट भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांनी केला. तसेच म. युवराज रामसिंग पाटील यांचा सत्कार संघाचे संचालक अमोल सुरेश पाटील यांनी केला. यावेळी संघाचे संचालक खुमानसिंग हिलाल पाटील, रायचंद शामिसंग परदेशी, गुलाब हिलाल पाटील, अमोल सुरेश पाटील, भीमराव ओंकार पाटील, गोविंद एकनाथ माळी, संघाचे माजी प्रेसिडेंट नगराज जुलाल पाटील, अजीत पवार गट राष्ट्रवादी कॉंग्रसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील, डी. डी. पाटील , संघाचे मनेजर, सुरेश पाटील, ग्रेडर दिलीप नरवाडे, क्लार्क साहेबराव पाटील ,विशाल भोई, शेतकरी, विठ्ठल पाटील, धर्मराज निकम, सुभाष पाटील, दिगंबर पाटील, शैलेश पाटील, सुनील पवार, रमजान पिंजारी, व हमाल पिरन कोळी, अमजद पठाण, रौफ शेख व शेतकरी बांधव उपस्थित होते. भडगांव शेतकरी सहकारी संघात सोयाबीन साठी १६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. सोयाबीन साठी ४८९२ रुपये हमी भावाने खरेदी करण्यात येणार आहे. तसेच दि. १५/१२/२०२४ पर्यत सोयबीन नोंदणी सुरु आहे. तालुक्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना खरेदीबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीचा लाभ घ्यावा. असे आवाहन संघाचे प्रेसिडेंट भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांनी केले आहे.
0 टिप्पण्या