चाळीसगाव महाविदयालयात दि. ७ रोजी वकृत्व स्पर्धा व पारीतोषीक वितरण समारंभ.


भडगाव प्रतिनिधी :-

राष्टीृय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव संचलीत नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविदयालय तसेच राष्टीृय ज्युनियर काॅलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विदयमाने स्व. शिक्षणमहर्षी यशवंतराव नारायणराव चव्हाण स्मृती करंडक राज्यस्तरीय महाविदयालयीन वकृत्व स्पर्धेचे उदघाटन व पारीतोषीक वितरण समारंभाचे आयोजन दि. ७ रोजी करण्यात आले आहे. हे स्पर्धेचे आठवे वर्ष आहे. यात दि. ७ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय ग्रामिण विकास राज्यमंञी एम. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर कार्यक्रमाचे उदघाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. 

तसेच पारीतोषिक वितरण समारंभ दि. ७ रोजी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता रा. स. शि. प्र. मंडळ लि. चाळीसगावचे अध्यक्ष डाॅ. विनायकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तर पारीतोषिक वितरण संस्थेचे सचीव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांच्या शुभहस्ते होणार आहे. विशेष सहकार्य अॅड. मुकेश आर पवार यांचे लाभत आहे. हा कार्यक्रम नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविदयालय चाळीसगाव येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमांना उपस्थितीचे आव्हान आयोजक नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयाचे प्राचार्य डाॅ. जी. बी. शेळके, राष्टीृय विदयालय व ज्युनियर काॅलेजचे प्राचार्य वाय. आर. सोनवणे, उप प्राचार्य डाॅ. मनोज एन शितोळे यांचेवतीने करण्यात आले आहे.