जन्म दाखले प्रकरण किरीट सोमय्या च्या दबावाने निरपराध नागरिकांवर अन्यायकारक गुन्हे – एकता संघटनेचा तीव्र निषेध.!!!


जळगांव प्रतिनिधी:-

जळगाव शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणात ४३ निरपराध नागरिकांना किरीट सोमय्या या राजकीय व्यक्तीच्या दबावाखाली गुन्हेगार ठरवून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा जळगाव जिल्हा एकता संघटना तीव्र शब्दांत निषेध करते.

शहरातील जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये अनेक निरपराध नागरिकांना अन्यायकारकरीत्या आरोपी ठरविण्यात आले असून, या संदर्भात जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र तसेच मुख्यमंत्री, राज्य मानवाधिकार आयोग आणि महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांना सोमवार 8 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.


या प्रकरणात तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे की, अर्जदार सर्वसामान्य नागरिक असून त्यांनी कोणतेही बनावट कागदपत्र तयार केलेले नाही. उलट वकील / एजंट यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे हे प्रकरण उभे राहिले. तरीसुद्धा प्रशासनाकडून निर्दोष नागरिकांवर कारवाई केली जात आहे, हे अत्यंत धक्कादायक आणि अन्यायकारक आहे.


विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राजकीय लाभ मिळवण्यासाठी या प्रकरणात उगाचच गोंधळ निर्माण करून पोलिसांवर दबाव टाकला आहे. त्यांच्या या वागण्यामुळे निर्दोष महिला व पुरुष नागरिकांवर मानसिक, सामाजिक व कौटुंबिक त्रास ओढवला आहे. हे वर्तन लोकशाहीला काळिमा फासणारे आहे.



एकता संघटनेच्या ठाम मागण्या :

१)निर्दोष ४३ नागरिकांवरील सर्व खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.

२)या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.

३) निरपराध नागरिकांचा छळ थांबवून त्यांना न्याय द्यावा.

४) राजकीय दबाव टाकणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी.

प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही, तर एकता संघटना मोठ्या प्रमाणावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांनी सांगितले.


*शिष्टमंडळात यांचा होता समावेश* 

मुफ्ती खालिद, हाफिज रहीम पटेल, फारुक शेख, अनिस शाह, मतीन पटेल, मौलाना गुफरान शेख , बबलू पटेल, आरिफ देशमुख, सय्यद जमील, रजाक पटेल, रहिमिद्दीनआदींचा समावेश होता.