आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगाव येथे आधुनिक इलेक्ट्रॉनिक डाइस व साउंड सिस्टीम प्रदान.!!!
भडगाव प्रतिनिधी :- भडगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेसाठी मा. आमदार श्री सत्यजित तांबे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक डाइस व साउंड सिस्टीम उपलब्ध करून देण्यात आली. या सुविधेमुळे शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यासोबतच सांस्कृतिक व सहशैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा मिळणार आहे.
या आधुनिक सुविधेमुळे शाळेमध्ये घेण्यात येणारे शैक्षणिक सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, नाट्यप्रयोग, विविध शालेय स्पर्धा तसेच समारंभ अधिक प्रभावी व दर्जेदार पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा आधुनिक साधनांचा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे. ही महत्त्वाची सुविधा मिळवून देण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मिर्झा नाजीम सर यांनी सातत्याने पाठपुरावा करून विशेष प्रयत्न केले. शिक्षणात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने त्यांनी संबंधित स्तरावर सतत संपर्क साधून सकारात्मक प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टी, कार्यक्षमता आणि नेतृत्वगुणांमुळे हा उपक्रम यशस्वी ठरला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्ग यांच्यावतीने मा. आमदार श्री सत्यजित तांबे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री मिर्झा नाजीम सर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. ही साउंड सिस्टीम व इलेक्ट्रॉनिक डाइस शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत मोलाची भर घालणारी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या